ग्रामपंचायत उंबरकोण

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

picture34

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायतीची सर्वसाधारण माहिती

गावाचे नाव : उंबरकोन  ता.इगतपुरी               सांकेतांक : १८३०६२

  1. ग्रामपंचायत स्थापना दिनांक ००/०० /१९९४
  2. ग्रामपंचायतीची लोकसंख्या :- १३१४ (२०११ जनगणनेनुसार)

स्त्री :- ६६९       पुरुष :- ६४५

अनु-जमाती :-१०७७        अनु-जाती :- १३८

  1. एकूण प्रभाग संख्या : ०३
  2. एकूण ग्रामपंचायत सदस्य संख्या : ०८
    1. अनु. जमाती : ०७
    2. अनु. जाती  : ०१

  3. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र :- ३१० हेक्टर
    1. बागायत : २५३. ०७ हे.
    2. जिरायत :                हे.
    3. बिनशेती :   ५६.९३   हे.
    4. एकूण खातेदार संख्या :
  4. गावाचे एकूण मतदान केंद्र :०१
    • . एकूण मतदार संख्या : ११३६  
  1. पुरुष :        स्त्री :         तृतीयपंथी : ००
  1. गावातील कुटुंब संख्या :- १३१४ (२०११ च्या जनगणनेनुसार)
  2. गावातील बांधीव मिळकती :- २१४ (२०११ च्या जनगणनेनुसार)
  3. गावातील नळजोडणी धारक :-२०१ (मार्च २०२५ पर्यंत)

10 .             वृक्ष लागवड :

  • . रस्ता दुतर्फा वृक्षलागवड करून संगोपन केले.
  1. मोकळे जागेत वृक्षलागवड करून संगोपन केले.
  2. शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्ष लागवड करून संगोपन केले.

११ .   रस्त्यावरील दिवाबत्ती :- एकूण पोल संख्या ४५

 

 

पाणी पुरवठा योजना

1. योजनाच्या पूर्वीची परिस्थिती उंबरकोन गावात सन १९८० पूर्वी झिरे, व खाजगी विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत होते.परंतु ग्रामपंचायतीने स्वत विहीर काढली व एक पाणी टाकी सन २०१३ मध्ये गावासाठी पाणीपुरवठा योजनेतून गावासाठी ४०००० क्षमतेची जमिनीवरील पाणीटाकी बांधून देण्यात आली. संपूर्ण योजना पाईपलाईन देखभाल दुरुस्तीसह ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात आली.

शिक्षण

उंबरकोन येथे जिल्हा परिषद शाळा आहेत.
यामध्ये उंबरकोन मध्ये ७ वर्ग खोल्या असून यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरवले जातात. विद्यार्थ्यांना शाळेसाठी नियमित विजपुरवठा होत असतो.तसेच शाळेमध्ये मुलांना खेळण्यासाठी मैदान पण उपलब्ध आहे. प्राथमिक शाळे मध्ये ३ वर्ग आहेत, तिथे आठवी ते दहावी परियत आहे.
गावातील अंगणवाडी :- उंबरकोन गावामध्ये एकूण २ अंगणवाडी आहेत. गावात नियमित अंगणवाड्या कार्यरत आहे.दोन्ही अंगणवाड्याना पुर्णवेळ अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनिस कार्यरत आहे.

घरकुल योजना

गावातील गरजु लाभार्थ्यांना शासनाच्या विविध घरकुल योजनेतुन लाभ दिला आहे . उदा. प्रधान मंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना , शबरी घरकुल, जनमन योजना , योजनांचा लाभ दिला आहे .

रस्ते व सांडपाणी

गावातील प्रत्येक गल्लीत सिमेंट, काँक्रीट चे रस्ते झाले असून प्रत्येक घरापर्यंत रस्ते आहेत, तसेच गावातील सांडपाणी हे भूमिकेत गटारंद्वारे शोषखड्ड्यां मध्ये सोडले जाते . तसेच घनकचरा व्यवस्थापन गावात केले गेले आहे

शौचालय

गावातील सर्व कुटुंबाना शासन च्या माध्यमातून नवीन शौचालय बांधून दिले आहे . गावातील सर्व नागरिक शौचालयाचा नियमित वापर करतात . गाव १००% हगणदारी मुक्त आहे .

गावातील प्रमुख व्यवसाय

शेती, आमच्या उंबरकोन गावा मध्ये मुख्ये पिक हे भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच इतर भाजीपाला हे पिक घेतले जाते. तसेच काही प्रमाणात बागायती पण केली जाते. प्रामुख्याने भात हा मोठ्या प्रमाणात घेतले जाते व आमच्या जवळपास घोटी बाजार पेठेत तो भात विकला जातो.जो काही विकला जातो. त्यावर लहान-मोठ्या उद्योजकांनी शेतीपूरक उद्योग या परिसरात सुरू केल्यामुळे शेतक-यांसोबतच बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी

अ.क्र 

कर्मचाऱ्याचे नाव 

पदनाम 

१.

श्री.रविंद्र बाळू भोये

ग्रामपंचायत अधिकारी 

२.

श्री. आत्माराम नामदेव सारुक्ते  

सरपंच

३.

श्री. हरीचंद्र रामभाऊ सारुक्ते

ग्रामपंचयात शिपाई

४.

श्री.भाऊराव खंडू सारुक्ते

पाणीपुरवठा कर्मचारी 

५.

श्री.किरण शंकर भांगरे

केंद्र चालक

६.

श्री. किरण जगन्नाथ शिंदे

ग्राम रोजगार स्वयंसेवक

उंबरकोन २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
जनगणना मापदंडजनगणना माहिती
एकूण लोकसंख्या1314
घरांची एकूण संख्या214
महिला लोकसंख्या % 
एकूण साक्षरता दर % 
महिला साक्षरता दर % 
अनुसूचित जमाती लोकसंख्या %07
अनुसूचित जाती लोकसंख्या %01
कार्यरत लोकसंख्या % 
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
200
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (32)
your paragraph text (33)
your paragraph text (34)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी